- पुण्यातील कोंढवा परिसरात गँगवॉरची घटना घडली आहे. आंदेकर टोळीतील समीर काळेचा भाऊ गणेश काळेचा खून करण्यात आला आहे. गणेश काळेवर आधी गोळ्या झाडण्यात आल्या, नंतर त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. पुण्यातील कोंढवा परिसरात आज शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. गणेश काळेचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणात अटकेत आहे.
गणेश काळे हा रिक्षा चालक होता. त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात दोन दुचाकीवर आलेल्या दोघांनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळेवर 6 गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या गणेश काळेला लागल्या. त्यानंतर दुचाकीवरील दोघांनी गणेश काळेवर कोयत्याचे वार केले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
गणेश काळेचं वय साधरण 30 ते 35 वर्ष होतं. आज दुपारी तीन वाजता कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात दोघांनी गणेश काळेचा खून केला.

टिप्पणी पोस्ट करा